Nauvari Saree For Bride: लग्नात सप्तपदीला नेसा या सुंदर नव्या डिझाईनच्या नऊवारी साड्या, सर्वजण पाहतच राहतील

Manasvi Choudhary

लग्न

लग्नाचा दिवस प्रत्येक मुलींसाठी खास असतो. लग्नात सुंदर दिसणे अशी प्रत्येक मुलींची इच्छा असते.

Wedding Saree

नऊवारी साडी डिझाईन्स

लग्नात नऊवारी साडी नेसण्याची मोठी क्रेझ आहे. नऊवारी साडीमध्ये मराठमोळा लूकमध्ये अनेक डिझाईन्स सध्या बाजारात आहेत.

Nauvari Saree For Bride

नऊवारी साडी डिझाईन्स

लग्नाचा प्रत्येक लूक हा परफेक्ट असावा यासाठी मुली बरीच मेहनत घेतात. आज आम्ही लग्नात सप्तपदीसाठी कोणत्या नऊवारी साड्या बेस्ट आहेत याविषयी सांगणार आहोत.

Nauvari Saree For Bride

पैठणी नऊवारी साडी

पारंपारिक लूकमध्ये तुम्हाला रॉयल लूक हवा असेल तर तुम्ही पैठणी नऊवारी साडी निवडू शकता. मोरपंखी, पोपट आणि फुलांच्या डिझाईनच्या या साड्या असतात.

Nauvari Saree For Bride

मस्तानी नऊवारी साडी

सध्या 'मस्तानी' स्टाईल नऊवारी साडीची महिलांमध्ये क्रेझ आहे. या साडीमध्ये महिला खुप सुंदर दिसतात. मॉडर्न स्टाईल ही साडी नेसल्यावर एकदम कम्फर्टेंबल वाटते.

Mastani Nauvari Saree

कॉटन सिल्क साडी

कॉटन सिल्क नऊवारी ही कम्फर्टेबल आणि हलकी असते. या साडीवर तुम्ही भरगच्छ ज्वेलरी लूक करू शकता. लग्नात खास सप्तपदीसाठी साडी नेसल्यावर लूक उठून दिसतो.

Cotton Silk Nauvari Saree

काठपदर सिल्क नऊवारी साडी

पारंपारिक लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगातील काठपदर साडी तुम्ही नऊवारी स्टाईल नेसू शकता. या साड्या नेसल्यावर अस्सल पारंपारिक लूक येतो.

Kathnpadar Silk Nauvari Saree

पेशवाई ब्राह्मणी नऊवारी

पेशवाई ब्राह्मणी नऊवारी हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. या पॅटर्नमध्ये साडी नेसल्यावर राजेशाही लूक दिसतो.

Brahmani Nauvari Saree

next: Homemade Thandai Recipe: पोटाची जळजळ ते अशक्तपणा होईल दूर, उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल गारेगार थंडाई

येथे क्लिक करा...