Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची लाहीलाही होत असते अशावेळी शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेक थंडगार पेय प्यायली जातात त्यापैकी एक म्हणजे थंडाई.
थंडाई प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर आतून थंड राहण्यास मदत होते. उन्हामुळे तुम्हाला अधिकच त्रास होत असेल तर तुम्ही थंडगार थंडाई प्या.
थंडाई घरी बनवण्याची अत्यंत सोपी पद्धती आहे. घरच्या घरी थंडाई कशी बनवायची हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
थंडाईमध्ये बडीशेप आणि गुलाबाच्या पाकळ्या मिक्स केल्याने यामुळे शरीर तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात अनेकांना पचनाचा त्रास संभवतो अशावेळी थंडाईमध्ये बडीशेप आणि खसखस घाला म्हणजे पचनक्रिया सुरळीत होते.
थंडाईमध्ये काजू, बदाम, पिस्ता हे ड्रायफ्रुट्स घातल्याने शरीराची प्रथिने आणि जीवनसत्वे यांची कमतरता भरून निघते तसेच शरीरातला थकवा दूर होतो.
थंडाईमध्ये लवंग घातल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
थंडाईमध्ये खसखस घातल्याने शरीरातील थकवा दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही थंडाईचे सेवन करावे शरीराला शांत झोप लागते.