ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोदावरीच्या काठावर वसलेल्या पैठण या शहरावरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. पैठणीला साड्यांची महाराणी देखील म्हटले जाते.
पैठणी साडी जितकी सुंदर यावर ब्लाऊजही ही तितकेच स्टायलिश ट्रेंडी असल्यास साडीवरील सौंदर्य आणखी खुलतं. म्हणून आम्ही तुम्हाला काही खास ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन सांगणार आहोत.
सध्या ब्लाऊजवर सुंदर नक्षीकाम असेल्या डिझाइनची क्रेझ आहे. मोर, पोपट, किंवा इत्यादी पक्षीचे नक्षीकाम तुम्हाला स्टायलिशसह रॅायल लूक देतील.
यामध्ये तुम्ही बोट नेक गळा शिऊ शकता. तसेच बॅकवर सुंदर आर्किटेक्चरल किंवा एखादी रॅायल डिझाइन तयार करु शकता.
या डिझाइनमध्ये तुम्ही लहान फुगीर बाही म्हणजेच शॅार्ट स्लीवज असलेले आणि लो नेकलाइन ब्लाऊज शिवू शकता. यामध्ये तुम्हाला स्टायलिश आणि मॅार्डन लूक मिळेल.
तुम्ही कॉलर डिझाइनचा पर्याय निवडू शकता. मँडरीन कॉलर आणि ज्याच्या हातावरर क्रिसक्रॉस डिझाइन असलेले ब्लाऊज तुम्हाला पारंपरिक आणि कॅान्फिडेंट लूक मिळेल.
जर तुम्हाला हटके लूक हवा असेल तर तुम्ही बॅकलेस ब्लाऊज शिवू शकता. ज्याच्या मागील बाजूस सुंदर लेस आणि हातांवर भरतकाम आहे.