ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीच्या निमित्ताने अनेक महिलांना खणाची साडी नेसायला आवडते. स्टायलिश लूकसाठी अनेकांना ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन हवे असतात.
जर तुम्हालाही सणासुदीसाठी पारंपारिकसह ट्रेंडी लूक हवाय मग हे डिझाइन नक्की ट्राय करा.
खणाच्या ब्लाऊजसाठी तुम्ही बोट नेक ब्लाऊज शिवू शकता. यावर तुम्हाला दागिने घालण्याची गरज भासणार नाही.
स्लिवलेस ब्लाऊज तुम्हाला स्टायलिश आणि मॅार्डन लूक देतील.
ब्लाऊजच्या हातांचे मोठे काठ खणाच्या साडीवर उठून येतात. यामुळे लूक अजून उठून येतो.
कॅालर नेक ब्लाऊज हा डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहे. हा तुम्हाला स्टायलिश लूक देईल, याशिवाय अशा डिझाइनचे ब्लाऊज ऑफिसमध्ये सुद्धा घालून जाऊ शकता.
खणाच्या साडीवर तुम्ही प्लेन कोणतीही डिझाइन नसलेला ब्लाऊज शिवू शकता. यावर तुम्ही हेवी ज्वेलरी परिधान करु शकता.
बॅकवर नथीची डिझाइन ब्लाऊजची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे.
NEXT: तुमच्या नखांचा रंग बदलतोय तर तर असू शकतं हे गंभीर कारण