Manasvi Choudhary
ऑफिस आणि कॉलेजमध्ये जाताना केसांची स्टाईल कशी करावी असा प्रश्न सर्वच महिला व मुलींना पडतो.
रोज नेहमी प्रमाणे तेच मोकळे केस सोडत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही स्टायलिश आणि कमी वेळात होणाऱ्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.
स्लीक लो अंबाडा ही स्टाईल तुम्ही करू शकता. केसांच्या मधून किंवा साईडने भांड पाडून मागील केसांचा मानेवर लो अंबाडा बांधा. साडी किंवा फॉर्मल लूकवर ही स्टाईल उठून दिसते.
कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी सर्वात ट्रेंडी स्टाईल म्हणजे हाय पोनीटेल. ही स्टाईल तुम्ही जीन्स, कुर्ती किंवा वेस्टर्न लूक वर करू शकता.
ज्यांना केस मोकळे ठेवायला आवडत नाही त्यांनी मागील केसांची वेणी बांधायची आहे. समोरून भांग पाडून बटा सोडायच्या आहेत.
सर्व केस एकत्र करून वरच्या बाजूला वळवा आणि मोठ्या क्लिपमध्ये अडकवा. पुढच्या काही बटा चेहऱ्यावर मोकळ्या सोडा.
समोरच्या एका बाजूने केस घेऊन लहान फ्रेंच वेणी घाला आणि ती कानामागे पिन करा. बाकी केस मोकळे ठेवा किंवा त्यांची पोनीटेल बांधा.