Manasvi Choudhary
विवाहानंतर प्रत्येक महिला गळ्यात मंगळसूत्र घालते. मंगळसूत्र हे महिलांच्या १६ श्रृंगारापैकी एक आहे.
मात्र काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही अनेक बदल दिसतात. पारंपारिक ते मॉडर्न दोन्ही स्टाईलमध्ये तुम्ही मंगळसूत्र निवडू शकता.
आजकाल महिलांना जास्त जड दागिने घालायला आवडत नाही. यासाठी तुम्ही कोणते लेटेस्ट मंगळसूत्र निवडू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
चांदीच्या दागिन्यांचा ट्रेंड सध्या आहे. साध्या आणि क्लासी लूकसाठी स्टर्लिंग सिल्वर बेस मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
सिल्वर रिमझिम ड्रॉप मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या छोट्या चेनसोबत खाली छोटी आकर्षक ड्रॉप्स किंवा पेंडंट जोडलेले असते. हे स्टायलिश मंगळसूत्र तुम्ही वेस्टर्न लूकवर ट्राय करू शकता.
ज्यांना गोल्डन डिझाईनमध्ये मंगळसूत्र हवे असते त्यांच्यासाठी मध्यभागी एक छोटा सॉलिटेअर डायमंड वर्क असलेला मंगळसूत्र बेस्ट ऑप्शन आहे.
सध्या महिलांमध्ये 'पालमोनास' ब्रँडचे ब्लॉसम डिझाइनचे मंगळसूत्र सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे मॉडर्न आऊटफिट्सवर अतिशय सुंदर उठून दिसते.
पारंपरिक काळ्या मण्यांना वेस्टर्न आणि ट्रेंडी टच देणारे हे मंगळसूत्र ऑफिसवेअर किंवा पार्टीवेअरसाठी बेस्ट ऑप्शन आहे.