Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Manasvi Choudhary

दुध

दुध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम हे महत्त्वाचे पोषक घटक असतात मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या दुधामध्ये कार्बोहायड्रेट, चरबी आणि कॅलरीचे प्रमाणही वेगळे असते.

Milk | pinterest

मधुमेह

मधुमेह किंवा ब्लड शुगरच्या रुग्णांनी दुध पिताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण वेगवेगळे दुध साखरेची पातळी वाढवू शकतात.

diabetes | pinterest

डायबिटीजच्या रूग्णासाठी कोणते दूध बेस्ट?

दुधाचे रोजच्या आहारात सेवन केले जाते. मात्र डायबिटीजच्या रुग्णांनी नेमके कोणते दूध प्यावे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

diabetes | GOOGLE

बदामाचे दूध

बदामाचे दूध हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हेल्दी मानले जाते. यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी असते. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Almond milk | pinterest

सोया मिल्क

सोयाबीनपासून बनवलेले दूध हे प्रथिनेयुक्त असते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि फॅट्सचे प्रमाणही कमी असते. सोया मिल्कमुळे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

Soy Milk | pinterest

गाईचे दूध

गाईचे दूध तुम्ही पिऊ शकता. यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात, परंतु मलई काढलेली असल्याने चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.

Cow Milk | GOOGLE

शेळीचे दूध

शेळीच्या दुधामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स आणि पोषक घटक असतात. हे पचनासाठी अत्यंत हलके मानले जाते आणि शरीरात जळजळ कमी करण्यास मदत करते.

Goat's Milk | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Mosambi Juice Benefits for Skin: चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी रोज प्या मोसंबीचा रस; जाणून घ्या आश्चर्यकारक सौंदर्य फायदे

Mosambi Juice Benefits for Skin
येथे क्लिक करा...