ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
इअररिंग्स महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. सध्या पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारचे इअररिंग्स भरपूर प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत.
झुमका हा सदाबहार दागिना आहे. साडी, लेहेंगा किंवा ड्रेस आणि कुर्त्यावर झुमके शोभून दिसतात. गोल्डन झुमके सध्या ट्रेंडमध्ये आहेत.
चांदबाली म्हणजे अर्धचंद्राच्या आकारात असलेले कानतले. चांदबाली हे लग्नसमारंभ आणि सणांसाठी परफेक्ट मानले जातात आणि मोठ्या प्रमाणात वापरले जातात . हे पारंपरिक लूकला रॉयल टच देतात.
गोलाकार हूप इअररिंग्स प्रत्येक वयोगटासाठी योग्य आहेत .हे इअररिंग्स लहान ते मोठ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत . वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न ड्रेससोबत छान दिसतात.
स्टड इअररिंग्स साधे आणि एलिगंट असतात. ऑफिस वेअर आणि डेली युजसाठी हे इअररिंग्स तुम्ही घालू शकता.
ऑक्सिडाईज्ड इअररिंग्सना सध्या प्रचंड मागणी आहे. कॉटन साडी, कुर्ता आणि अनेक लूकसाठी हे इअररिंग्स बेस्ट पर्याय आहेत.
मण्यांपासून किंवा धाग्यांपासून बनवलेले टॅसल इअररिंग्स तरुणींमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. हे पार्टी व कॅज्युअल लूकसाठी परफेक्ट आहेत.
ड्रॉप इअररिंग्स लांब आणि आकर्षक दिसतात. फॉर्मल इव्हेंट्स आणि पार्टीसाठी हे इअररिंग्स परफेक्ट आहेत.
कर्णफूल किंवा इअर कफ्स हे सध्याचा मॉडर्न ट्रेंड सुरु आहे. पियर्सिंग शिवायही घालता येणारे हे इअररिंग्स तरुणींमध्ये विशेष आवड निर्माण झाली आहे.