Shruti Vilas Kadam
दिवाळीसाठी पफ स्लीव्हज ब्लाऊज हा सुंदर पर्याय आहे. फुग्याच्या आकाराच्या बाह्यांमुळे ब्लाऊजला आकर्षक आणि पारंपरिक लूक मिळतो. सिल्क किंवा कॉटन साडीवर हे डिझाइन छान दिसते.
रॉयल आणि एलिगंट लूक हवा असेल तर हाय नेक ब्लाऊज निवडा. यावर सुंदर भरतकाम, मोती किंवा बारीक नक्षीकाम केल्यास साधी साडीही उठून दिसते.
थोडा मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक हवा असेल तर डीप व्ही नेक ब्लाऊज ट्राय करा. साध्या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज घातल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.
दिवाळीच्या सणासाठी मिरर वर्क ब्लाऊज उत्तम पर्याय आहे. छोट्या आरशांचे सुंदर काम असलेला ब्लाऊज साध्या साडीला सणासुदीचा खास लूक देतो.
ब्लाऊजच्या मागील बाजूस मोठी बो किंवा गाठ असलेले डिझाइन सध्या आकर्षक दिसते. साध्या साडीवर असे ब्लाऊज घातल्यास लूकला वेगळाच टच मिळतो.
फुल स्लीव्हज ब्लाऊजमुळे साडीला क्लासी आणि रॉयल लूक मिळतो. बाह्यांवर लेस, मोती किंवा सुंदर भरतकाम केल्यास ब्लाऊज अधिक सुंदर दिसतो.
साध्या साडीला हटके लूक द्यायचा असेल तर प्रिंटेड मल्टीकलर ब्लाऊज निवडा. फ्लोरल, पारंपरिक किंवा आकर्षक प्रिंट्स असलेले ब्लाऊज साध्या साडीवर छान दिसतात.