Manasvi Choudhary
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी महिला व मुली अनेक घरगुती उपाय करतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर गुलाबी चमक येण्यासाठी सोपी ट्रिक सांगणार आहोत.
तुम्ही घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बीटरूट फेस क्रिम बनवू शकता यामुळे त्वचेला गुलाबी चमक येईल.
बीटाचा उपयोग नैसर्गिक सौंदर्यासाठी केला जातो. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध बीटरूट त्वचेला लावल्याने चेहरा उजाळतो.
बीटरूट फेस क्रिम बनवण्यासाठी बीट, कोरफड, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, बदाम तेल हे साहित्य एकत्र करा.
एका बाऊलमध्ये बीट रस आणि कोरफड जेल यांचे मिश्रण एकत्र करा. या मिश्रणात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण चांगेल फेटून घ्या म्हणजेच या मिश्रणाची क्रिम तयार होईल.
एका काचेच्या छोट्या डब्बीमध्ये ही तयार झालेली गुलाबी क्रिम ठेवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
Next: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा