Manasvi Choudhary
कोणत्याही साडीलूकवर परफेक्ट ब्लाऊजची निवड करणे महत्वाचे असते. लाल रंगाचा ब्लाऊज हा प्रत्येक साडीवर उठून दिसतो.
लाल रंगाच्या ब्लाऊजचे अनेक डिझाईन्स व पॅटर्न्स आहेत जे तुम्ही देखील निवडू शकता.
पफ स्लीव्हज विथ बॉर्डर जुन्या काळातील 'फुग्याच्या बाह्या' आता पुन्हा एकदा फॅशनमध्ये आल्या आहेत.
फॅशनेबल आणि प्रोफेशनल लूकसाठी 'पिटर पॅन' किंवा हाय नेक कॉलर ब्लाऊज भारी आहे.
आजकाल महिला फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज परिधान करतात. फुग्यांच्या हातांचे ब्लाऊज साडीवर अधिक उठून दिसतात. यामध्ये ब्लाऊजच्या हाताला फुगीर डिझाईन असते.
लाईट कलरची फॅन्सी साडी नेसायची असल्यास त्यावर तुम्ही ऑफ शोल्डर, किंवा डिपनेक डार्क रंगाचा ब्लाऊज परिधान करू शकता.
अनेकांना ब्लाऊजचा मटका गळा पॅटर्न शिवायला आवडतो. हा पॅटर्न सिंपल पण स्टायलिश आहे.
व्ही' आकाराचा ब्लाऊजचा गळा कायमच ट्रेडिंगमध्ये असतो नेट, शिफॉन किंवा ऑर्गेंझा साड्यांवर हे डिझाईन खूप सुंदर दिसते.
एल्बो लेंथ' बाह्या विथ मॅगम वर्क हा ब्लाऊज पॅटर्न सिल्क साडीवर शोभून दिसतो.
डिझायनर साड्या, बॅकलेस गळे आणि ट्रान्सपरंट फॅब्रिकसाठी पॅडेड ब्लाऊजला पसंती दिली जात आहे.