Saam Tv
तुमचा प्रवास सुरक्षित आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी ६ सोप्या ट्रॅव्हल टिप्स
दागिने, पासपोर्ट किंवा रोख रक्कम सुरक्षिततेसाठी अनेकदा लॉकरमध्ये ठेवली जाते आणि घाईत ती तिथेच विसरली जाते. चेकआउट करण्यापूर्वी लॉकर उघडून ते पूर्णपणे रिकामे असल्याची खात्री करा.
अंगठी, घड्याळ किंवा लहान कपडे अनेकदा बेडखाली किंवा टेबलच्या ड्रॉवरमध्ये पडतात. चेकआउटपूर्वी सर्व ड्रॉव्हर्स आणि कपाट उघडून नक्की तपासा.
महागडे फेसवॉश, परफ्युम, रेझर किंवा इलेक्ट्रिक टूथब्रश बाथरूममध्ये विसरण्याची शक्यता जास्त असते.
मोबाईल, लॅपटॉप किंवा कॅमेऱ्याचे चार्जर स्विच बोर्डमध्येच विसरले जातात. चेकआउट करण्यापूर्वी रूममधील सर्व स्विच बोर्ड तपासून चार्जर बॅगमध्ये ठेवा.
सुकण्यासाठी घातलेले ओले कपडे, रुमाल किंवा स्विमिंग कॉस्ट्यूम बाल्कनीत किंवा बाथरूममध्ये राहून जातात. बॅग पॅक करताना या जागा तपासायला विसरू नका.
पेमेंट करण्यापूर्वी बिल नीट वाचून घ्या. न वापरलेल्या सेवा, मिनी-बार किंवा पाण्याच्या बाटल्यांचे अतिरिक्त शुल्क चुकून जोडले गेले नाही ना, याची खात्री करा.
या सोप्या टिप्स पाळा आणि कोणत्याही काळजीशिवाय तुमच्या ट्रिपचा पूर्ण आनंद घ्या.
NEXT : खरंच दिवसाला ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी