ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रवासाची मजा द्विगुणित होते जेव्हा चांगली गाणी सोबत वाजत असतात. लांबचा प्रवास असो किंवा छोटासा प्रवास, गाडीच्या खिडकीबाहेरचा देखावा आणि कानात वाजणारी बॉलिवूड गाणी.
उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील दुश्मन चित्रपटातील हे गाणे खूप सुंदर आहे. बहुतेक लोकांना प्रवासादरम्यान हे गाणे ऐकायला आवडते.
शाहरुख खानच्या स्वदेस चित्रपटातील 'यूं ही चला चल' हे गाणे देखील प्रवास करताना ऐकण्यासाठी सर्वोत्तम गाणे आहे. उदित नारायण, कैलाश खेर आणि हरिहरन यांच्या आवाजात गायलेले हे गाणे कानांना आनंद देणारे आहे.
'ओल्ड इज गोल्ड', ही म्हण या सदाबहार गाण्यावर अगदी बरोबर बसते. जर तुम्ही प्रवास करताना हे गाणे ऐकले नसेल, तर तुम्ही हे गाणं ऐकल पाहिजे.
जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत लाँग ड्राईव्हचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेला असाल, तर तुम्ही अरिजीत सिंग यांनी गायलेले 'सूरज डूबा है यारों' हे गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट केले पाहिजे.
जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला लाँग ड्राईव्हवर घेऊन जात असाल, तर टशन चित्रपटातील 'फलक तक चल साथ मेरे' हे गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट केले पाहिजे.