Manasvi Choudhary
मंगळसूत्र हा पारंपरिक दागिना असला तरी यात अनेक मॉडर्न डिझाईन्स पाहायला मिळतात.
साडीपासून ते मॉडर्न आउटफिटपर्यंत विविध लूकवर शोभून दिसतील ५ पॅटर्न्स या वेबस्टोरीतून पाहूया.
हलके, साधे आणि स्टायलिश मंगळसूत्र रोजच्या वापरासाठीही तुम्ही निवडू शकता.
जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी हलके आणि स्टायलिश मंगळसूत्र हवे असेल, तर तुम्ही डायमंड सिंगल चैन मंगळसूत्र निवडू शकता.
पारंपारिक सोन्याच्या वाट्यांमध्ये तुम्ही नवीन डिझाईन्समध्ये अश्या पद्धतीचे मंगळसूत्र निवडू शकता जे युनिक दिसेल .
काळ्या मण्यांच्या दोन पदरी बारीक सर आणि त्यावर आकर्षक फ्लोरल डिझाईनचे सोन्याचे पेंडंट असलेले हे मंगळसूत्र साडीवर आणि वेस्टर्न लूकवर उठून दिसते.
पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी टेम्पल डिझाईनचे पेंडंट असलेले मंगळसूत्र भारी दिसते.