Manasvi Choudhary
पाट्यावरची कांदा- लसूण चटणी चवीला भारी लागते. अनेक घरामध्ये कोणत्याही भाजीसोबत ही चटणी आवडीने बनवली जाते.
मिक्सरमध्ये चटणीला मूळ चव येत नाही जी दगडी पाटा आणि वरवंट्यावर कुटल्यामुळे येते.
आजीच्या हातच्या चवीची 'पाट्यावरची कांदा-लसूण चटणी' बनवण्याची पारंपरिक पद्धत सोपी आहे.
कांदा- लसूण चटणी बनवण्यासाठी कांदा, लसूण, लाल मसाला, जिरे, मीठ, शेंगदाणे, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
कांदा लसूण चटणी बनवण्यासाठी कांद्याची साल न काढता कांदा भाजून घ्या. कांदा बाहेरून काळा झाल्यानंतर तो आतून चांगला शिजला जातो.
सर्वात आधी पाट्यावर जिरे आणि मीठ ठेवून ते वरवंट्याने थोडे भरडून घ्या. त्यानंतर त्यावर लसणाच्या पाकळ्या ठेवून त्या ठेचून घ्या
आता भाजलेला कांदा सोलून त्याचे तुकडे पाट्यावर ठेवा. वरवंट्याने कांदा ठेचत असतानाच त्यात लाल तिखट मिसळा.
जर तुम्हाला कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे असतील, तर ते आता घालून सर्व मिश्रण एकत्र वाटून घ्या.
चटणी पाट्यावरून काढल्यावर एका वाटीत घ्या आणि त्यावर १ चमचा कच्चे शेंगदाणा तेल टाका. यामुळे चटणीचा ठसका कमी होतो आणि चव दुपटीने वाढते.