ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ज्वारी हे शरिरीक आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक धान्य मानले जाते.
मधुमेहाच्या रूग्णांनासुद्धा ज्वारीच्या पिठाची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो.
पण ज्वारीच्या पिठापासून बनलेली हलवा मिठाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? चला तर मग जाणून घेऊया झटपट रेसिपी.
ज्वारीचं पिठ, बेसन, तूप, दूध, साखर किंवा गुळ, वेलची पूड, केसर आणि काजू बदाम
गरम तूपात ज्वारीचं पिठ रंग बदलेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. त्यात बेसन घालून मिश्रण ५-६ मिनिटे पुन्हा भाजून घ्या.
भाजलेल्या पिठात केसर घातलेले गरम दूध घाला. गुठळ्या होणार नाहित याची काळजी घ्या.
मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात गरजेनूसार साखर किंवा गुळ घाला. मिश्रण एकजीव करून घ्या.
मिश्रणात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घाला. तूप लावलेल्या ताटात मित्रण काढून घ्या.
थंड झाल्यावर चौकोनी काप करून घ्या. काजू बदामाने सजवा. ज्वारीच्या पिठाचा हलवा तयार आहे.