ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्वांनाच परफेक्ट आकाराचे आणि चविचे मोदक करता येत नाहीत.
पण गणरायाला आपण स्वतः बनवलेला नैवेद्य अर्पण करावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते.
बेसन आणि दूध वापरून तुम्ही अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य बनवू शकता.
बेसन, दूध, साखर, खोबऱ्याचा किस, तूप, ड्राय फ्रूट्स आणि केसर
एका कढईत बेसन भाजून घ्या. भाजलेल्या बेसनात बारिक चिरलेले ड्राय फ्रूट्स घाला. मिश्रण पुन्हा भाजून घ्या.
दुसऱ्या कढईत दूध उकळवून घ्या. त्यात गरजेनूसार खोबऱ्याचा किस आणि साखर घाला.
दूधातली साखर विरघळल्यानंतर त्यात केसर घालून २-३ मिनिटे दूध उकळवून घ्या.घट्ट मिश्रण
उकळलेले दूध भाजलेल्या बेसनाच्या मिश्रणात घाला. घट्ट मिश्रण तयार करा.
मोदकाच्या मोल्डला तूप लावून मोदक तयार करून घ्या. लाडक्या गणेशासाठी मोदकांचा नैवेद्य तयार आहे.