Manasvi Choudhary
वेस्टर्न असो या एथनिक कपड्यांची स्टाईल कोणतीही असो मात्र हेअरस्टाईल योग्य असणे महत्वाचे आहे.
साडी, ड्रेस या पारंपारिक सौंदर्यात तुम्ही स्टायलिश हेअरस्टाईल निवडू शकता.
पैठणी किंवा काठपदर साडीवर हा लूक सर्वात जास्त उठून दिसतो. केसांना मध्यभागी किंवा बाजूला भांग पाडून मागे घट्ट अंबाडा बांधा
ज्यांना पूर्णपणे जुन्या पद्धतीचा अंबाडा नको आहे, फ्रेंच अंबाडा आणि त्याला बाजूने फुले लावावीत.
जर तुमचे केस लांब असतील, तर तुम्ही वेणी बांधू शकता यामुळे देखील केस छान राहतात.
जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे असतील तर ही स्टाईल ट्राय करा. पुढचे काही केस घेऊन मागे क्लिप लावा आणि खालचे केस मोकळे सोडा
खपा हा अंबाडा मानेच्या जवळ बांधला जातो. केसांची पूर्णपणे मागे ओढून लो-बन बनवा.
जर कपाळ मोठे असेल, तर पुढच्या बाजूने 'फ्लिक्स' काढा. यामुळे लूक परफेक्ट दिसतो