Manasvi Choudhary
विवाहित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हे शुभ मानले जाते. मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून ते सौभाग्याचे प्रतीक आहे.
आजकाल अनेक महिला साडीवर मॅचिंग स्टायलिश मंगळसूत्र परिधान करतात.
पैठणी साडीवर पारंपरिक वाटी मंगळसूत्र सर्वात सुंदर दिसते तुम्ही देखील पैठणी साडीवर हा पॅटर्न ट्राय करू शकता.
आजकालच्या हलक्या आणि ट्रेंडी साड्यांवर मोठे मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आहे तुम्ही ऑर्गेन्झा किंवा शिफॉन साडीवर हे स्टाईल निवडू शकता.
कॉटन किंवा लिनन साडीवर तुम्ही ऑक्सिडाइज्ड मंगळसूत्र निवडू शकता. ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी लिनन साड्या खूप लोकप्रिय आहेत.
बनारसी किंवा कांजीवरम सारख्या सिल्क साड्यांवर लांब मंगळसूत्र शोभून दिसते. लांब मंगळसूत्रामुळे सिल्क साडीचा काठ आणि नक्षी स्पष्टपणे उठून दिसते.
जर तुमच्या ब्लाउजचा गळा 'ब्रॉड' म्हणजेचच मोठा असेल, तर गळ्याशी बसणारे मंगळसूत्र निवडा. जर गळा बंद असेल, तर लांब मंगळसूत्र उत्तम दिसेल.