Manasvi Choudhary
मोठं मंगळसूत्र घालण्याचा सध्या नवीन ट्रेंड आहे. लग्नसराई आणि सणासुदीला महिला साडीवर लांब मंगळसूत्र घालतात.
लांब मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न तुम्ही नक्की निवडू शकता जे कोणत्याही साडीवर उठून दिसतील.
मंगळसूत्र पारंपारिक कोल्हापुरी साजमधील 'पानडी', 'मणी' आणि 'पदक' यांचा वापर करून बनवलेले लांब मंगळसूत्र सध्या खूप लोकप्रिय आहे.
काळ्या मण्यांच्या दोन किंवा तीन सरा असतात आणि मध्यभागी एक मोठे पारंपारिक पदक असते. पैठणी, खण साडी किंवा कोणत्याही काठपदराच्या साडीवर हे मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसते.
दक्षिण भारतीय धाटणीचे हे मंगळसूत्र ट्रेडिंगमध्ये आहे. पेंडंटवर लक्ष्मी, कमळ किंवा मोराची नक्षी कोरलेली असते. पेंडंटचा आकार मोठा असतो आणि वाटीला जोडलेले घुंगरू याला एक वेगळा लुक देतात.
जर तुम्हाला किंवा 'रॉयल' लूक हवा असेल, तर कुंदन वर्कचे लांब मंगळसूत्र उत्तम आहे.
फुलांच्या किंवा पानांच्या नाजूक नक्षीचे पेंडंट असते. दोन वाट्यांच्या जागी आता केवळ एकच मोठे फुलांचे डिझाईन असलेले पेंडंट वापरले जाते.
लॉन्ग मंगळसूत्र साधारणपणे ३० ते ३६ इंचाचे असते. तुमच्या उंचीनुसार लांबी निवडा जेणेकरून ते पोटाच्या वरच्या भागात व्यवस्थित बसेल.