Manasvi Choudhary
गौरी- गणपतीचा उत्साह सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गौरी उत्सवात गौरी सजावट करण्याला विशेष महत्त्व असते.
गौरी सजावटीसाठी तुम्ही देखील अस्सल पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने घेण्याचा विचार करत असाल तर नथ, ठुशी आणि बोरमाळ यांसारखे पारंपरिक दागिने निवडा.
गौरीच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी पारंपरिक नाकफुडी किंवा नथ घाला. सध्या पेशवाई किंवा ब्राह्मणी, कुंदन-हिऱ्याची नथीचे प्रकार ट्रेंडमध्ये आहेत.
गळ्यात उठून दिसणारी सोन्याच्या लहान मण्यांनी विणलेली ठुशी तुम्ही निवडू शकता. गौरीच्या गळ्यात ठुशी घातल्याने पारंपारिक लूक मिळेल.
बोरमाळ तुम्ही गौरीच्या सजावटीसाठी पारंपारिक दागिने म्हणून निवडू शकता.
गौरीच्या पेहरावाला राजेशाही लुक देण्यासाठी मोहनमाळ किंवा चंद्रहार तुम्ही निवडू शकता.
केवळ गळा आणि नाकच नाही, तर गौरीच्या हाताची शोभा वाढवण्यासाठी सोन्याचे पाटल्या, बांगड्या निवडा.