Manasvi Choudhary
केसगळतीच्या समस्येमुळे आजकाल महिलांपासून ते पुरूष त्रस्त आहेत. आहारातील पोषक घटकांची कमतरतेमुळे केस गळतीची समस्या वाढते.
केसांची निगा राखण्यासाठी केवळ तेलं, शॅम्पू आणि हेअर मास्क वापरून फायदा नाही तर तुम्ही आहारामध्ये काही पदार्थाचा समावेश करणे महत्वाचे आहे.
केसांची मुळे मजबूत करण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी आहारात ४ सुपरफूड्सचा समावेश करा.
तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-६ फॅटी ऍसिड असते. तिळाचे सेवन केल्यामुळे टाळू स्वच्छ होतो आणि डोक्याचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
मेथीमध्ये प्रोटीन भरपूर असते, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जाते. मेथीचे दाणे भिजवून खाल्ल्याने केस गळती थांबण्यास मदत होते.
कढीपत्तामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने हे गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते आणि केसांच्या मुळे मजबूत होतात.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि कॉपर असते. जे केसांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि केसांची चमक वाढवते.