घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Manasvi Choudhary

गणेशोत्सव

गणेशोत्सव हा घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणणारा सण मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार या काळात काही सोपे उपाय केल्याने घरात सुख- समृद्धी नांदते.

5 Ganeshotsav Remedies for Wealth and Prosperity

आर्थिक समृद्धीसाठी उपाय

गणेशोत्सवात आर्थिक समृद्धी आणि घरातील सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी 5 सोपे वास्तु उपाय करावेत.

5 Ganeshotsav Remedies for Wealth and Prosperity | yandex

उत्तर किंवा पूर्व दिशा

गणेशोत्सवात बाप्पाची मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. ही दिशा धनाची देवता मानली जाते.

Direction of Ganpati Idol

गणपतीला सुपारी आणि हळदीची गाठ अर्पण करा

गणेशोत्सवात गणपती पूजेच्या वेळी एक सुपारी आणि हळदीची गाठ ठेवा. पूजा झाल्यानंतर ती सुपारी आणि हळदीची गाठ लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत ठेवा.

Direction of Ganpati Idol | Canva

मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने आणि रोपाची सजावट

गणेशोत्सवादरम्यान घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावा. तसेच दारासमोर सुंदर रांगोळी काढा. मुख्य दार हे माता लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मानला जातो, त्यामुळे ते स्वच्छ आणि सजवलेले असल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो.

Ambyache toran | Canva

बाप्पाला नैवेद्य आणि दुर्वा अर्पण करा

गणपतीची दररोज मनोभावे पूजा करून त्यांना २१ दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवेद्य दाखवा. धार्मिक मान्यतेनुसार, नियमित दुर्वा अर्पण केल्याने घरातील सर्व वास्तू दोष नाहीसे होतात आणि रखडलेले किंवा अडकलेले पैसे मार्गी लागतात.

Ukadiche modak | saam tv

कपाटात किंवा तिजोरीत ठेवा कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र

गणेशोत्सवादरम्यान चांदीचे किंवा भोजपत्रावर लिहिलेले 'श्रीयंत्र' किंवा 'कुबेर यंत्र' घरी आणून त्याची विधीवत पूजा करा आणि ते तुमच्या पैशांच्या तिजोरीत किंवा कपाटात स्थापित करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आर्थिक स्थिरता बळकटीस येते.

कुबेर | YANDEX

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Ganpati Naivedya Banana Leaf Uses
येथे क्लिक करा..