Manasvi Choudhary
बुगडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीतला पारंपारिक दागिना आहे. अत्यंत नाजूक आणि सुंदर हा दागिना कानामध्ये घातला जातो.
बुगडी दागिन्यांमध्ये अनेक विविध पॅटर्न्स आहेत जे तुम्ही एथनिक स्टाईलसाठी निवडू शकता.
पारंपारिक मोत्याची बुगडीमध्ये मध्यभागी एक छोटा सोन्याचा मणी किंवा खडा असतो आणि त्याच्या भोवती ६ ते ७ लहान मोती फुलाच्या आकारात गुंफलेले असतात.
पेशवाई किंवा नक्षीकाम बुगडी यात मोत्यांऐवजी सोन्याचे बारीक नक्षीकाम असते. काही डिझाईन्समध्ये बारीक घुंगरू किंवा सोन्याच्या पानाच्या आकाराचे पेंडंट असते.v
जर तुमच्या साडीचा रंग लाल किंवा हिरवा असेल, तर मध्यभागी माणिक (Red) किंवा पाचू खडा असलेली बुगडी खूप छान दिसते.
कान-साखळी बुगडी यात बुगडीला एक नाजूक मोत्याची किंवा सोन्याची साखळी जोडलेली असते, जी केसांमध्ये किंवा कानाच्या मागे पिन केली जाते.
ऑक्सिडाइज्ड बुगडी सिल्व्हर किंवा ब्लॅक मेटलमध्ये बनवलेली ही बुगडी 'इंडो-वेस्टर्न' लूकसाठी वापरली जाते.