Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर केस नेमके कसे बांधायचे असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो अशावेळी आज आम्ही काही सोप्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.
साडीलूकवर केसांचे सौंदर्य आणखी खुलून येते. तुम्ही ज्या प्रकारे केसांची स्टाईल करता.
पारंपारिक 'खोप' किंवा अंबाडा ही साडीवर महिलांसाठी लोकप्रिय हेअरस्टाईल आहे. केसांचा हलका पफ काढून मागे लो बन बांधला जातो.
या स्टाईलवर तुम्ही विविध फुलांचे गजरे देखील लावू शकता यामुळे पारंपारिक लूकला आणखी शोभा येते.
जर तुमचे केस लांब असतील तर तुम्ही केसांची वेणी घाला आणि एका बाजूला तिचा बन बांधा यामध्ये वेणीच्या वळणावर छोटे बिल्वे किंवा खड्यांचे स्टड्स लावा.
मेसी लो बन हा पारंपारिक स्टाईलमधील सोपा प्रकार आहे. केस खूप घट्ट न बांधता थोडे सैल सोडून मागे एक अंबाडा बांधा. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी केसांच्या काही बटा बाहेर सोडा.
ज्यांना केस मोकळे ठेवायला आवडतात त्यांच्यासाठी साईड-स्व्रेप्ट वेव्स ही स्टाईल करा. यावर तुम्ही कानाच्या मागे एखादे मोठे 'गुलाबाचे फूल' किंवा 'डिझायनर पिन' लावा.