Tanvi Pol
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कराड हे शहर प्राचीन संस्कृती, ऐतिहासिक घटना आणि अद्भुत वास्तूंनी भरलेलं आहे.
त्यातही नकटया रावळाची विहीर ही एक अशी वास्तू आहे, जी केवळ पाण्याचा स्रोत नव्हती, तर ती रणनीती, गुप्तता आणि सुरक्षेचं उत्तम उदाहरण होती.
ही विहीर केवळ वास्तुकलाच नव्हे, तर इतिहासाचाही एक जिवंत पुरावा आहे.
कराड शहरात येणार असाल तर ही नकटया रावळाची विहीर पाहण्यासाठी चुकूनही विसरु नका.
नकटया रावळाची विहीर ही सामान्य विहिरीसारखी नाही. ती तब्बल सात मजली आहे.
आज नकटया रावळाची विहीर हळूहळू पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनते आहे.
कराड शहरात येणारे पर्यटक ही विहीर पाहण्यास उत्सुक असतात.