Manasvi Choudhary
अफाट निसर्गसौंदर्य, लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, हत्तीचे कळप आणि थंड हवेची ठिकाणे यासाठी दक्षिण भारतातील केरळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
भारतातातील दक्षिण टोकाला असलेले केरळ हे देवभूमी म्हणून देखील ओळखले जाते.
दक्षिण भारतात अशी काही पर्यटन स्थळे आहे जेथे गेल्यावर पर्यटकांना स्वर्ग सुख वाटते.
केरळमधील मुन्नार हे पर्यटनस्थळ सर्वात सुंदर आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालते. चहाच्या बागा आणि हिरवेगार जंगल पर्यटकांना आकर्षित करते
केरळमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक अलेप्पी. येथे बॅकवॉटर ट्रिपचा मनमुराद आनंद लुटता येतो.
अरबी समुद्राची राणी म्हणून कोचीला ओळखले जाते. हे केरळचे प्रमुख व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हटले जाते.
त्रिवेंद्रम म्हणून ओळखले जाणारे तिरुवनंतपुरम. ही केरळची राजधानी आहे. भारतातील प्रसिद्ध मदिरांपैकी तिरुअनंतपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिर आहे