Manasvi Choudhary
केळी हे फळ उत्तम आरोग्यासाठी खाणे फायद्याचे असते.
केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ए, बी, सी आणि व्हिटॅमिन बी 6 असते.
मात्र, केळी खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाऊ नयेत असं सांगितलं जातं. कारण केळी आणि काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो.
केळी खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारची डाळ खाऊ नये. मसूर, तूर अशा डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. पण केळी खाऊन यांचे सेवन करणे हानिकारक असते.
केळी खाल्ल्यानंतर दही खाऊ नये, त्यामुळे अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होतो.
चहा आणि केळी हे दोन्ही वाईट अन्न संयोजन आहेत आणि ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. म्हणूनच केळी खाल्ल्यानंतर कधीही चहा पिऊ नका. किंवा चहा प्यायल्यानंतर केळी खाऊ नका.