Shruti Vilas Kadam
मुंबई पुण्यातून फिरायला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यासह अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस, दरडी कोसळण्याचा धोका आणि वेगवान धबधब्यांमुळे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट , शिवलिंग पाईन्ट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी करण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे निर्बंध लागू केले असून संबंधित यंत्रणांना अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.
बंदी असलेल्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
पावसाळ्यात ट्रेकिंग, धबधब्यांवरील सहली आणि धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
सह्याद्री परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दरडी, पाण्याचा वाढलेला प्रवाह आणि वाहतूक अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.