Bharat Jadhav
ऑफिसमधून रजा घेऊन ट्रिप प्लॅन करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या ते जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला दोन दिवसांचा ट्रिप प्लॅन करायचा असेल तर तुम्ही वीकेंडला प्लॅन करावा.
दोन दिवसांत सहलीवरून परतायचे असेल तर तुम्ही शुक्रवारी रात्रीच तुमच्या निश्चित ठिकाणाकडे निघा.
रात्रीच्या वेळी प्रवासाचे नियोजन करावं. यामुळे तुमचा दिवस खराब होत नाही.
शनिवार आणि रविवारी दिवसभर फिरा आणि नंतर रविवारी रात्री परतीचा प्रवास सुरू करा.
रविवारी घरी पोहचल्यावर आराम होईल. यामुळे तुमची झोप होईल आणि सोमवारी सकाळी ऑफिसला फ्रेश मूडमध्ये जाऊ शकता.
रविवारसोबत कोणता सण येत असतील तर तुम्ही दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ट्रिप प्लॅन करू शकता.
दोन दिवसाचा प्लॅन असेल तर तुम्ही तुमची ट्रिप २०० ते २५० किमीच्या अंतरामधील असावी.
जर तुम्ही ट्रिपला स्वतःच्या वाहनाने जात असाल तर तुम्हाला अजून जास्त मजा येईल.