Dhananjay Munde: ...तरच धनंजय मुंडेंचं भलं होईल, मुंडेसाहेबांच्या विधानाची चर्चा रंगली

Bharat Jadhav

सरपंच देशमुख हत्या प्रकरण

संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड तुरुंगात आहे. मात्र तो धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्यामुळे मुंडे अडचणीत आलेत.

काकांना दोघांच्या मैत्रीची चिंता

स्व. गोपीनाथराव मुंडेंनी साधारण ११ वर्षांपूर्वी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या मैत्रीबाबत एक विधान केलं होतं. त्यात त्यांनी चिंता व्यक्त केली होती.

गोपीनाथ मुंडेंच्या विधानाची चर्चा

धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्यामुळे गोपीनाथ मुंडें याच्या मुलाखतीची चर्चा सुरू झालीय. यात त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुडेंच्या मैत्रीबाबत भाष्य केलं होतं.

कधी केलं होतं विधान

पत्रकार आणि 'अॅनालायझर'चे संपादक सुशील कुलकर्णी यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडेंनी २०१४ मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

कराडमुळे धनंजय मुंडेंच्या आयुष्यात दु:ख

वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या आयुष्यात चांगलं आणू शकणार नाही, असं विधान गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं.

भलं होणार नाही

वाल्मिक कराडबाबत धनंजय मुंडेंना कळणार नाही तोपर्यंत त्यांचं भलं होणार नाही.

..तरच भलं होईल

धनंजय मुंडे यांनी वाल्मिकला सोडलं तरच त्यांचं भलं होईल. वाल्मिक क्रूरपणे राजकारण करतो, असं विधान मुंडेसाहेबांनी केलं होतं.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Fasting: उपवास करणं आरोग्यासाठी चांगलं असतं का?