Bharat Jadhav
मुस्लीम समुदायासाठी सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्याला आजपासून 2 मार्चपासून सुरुवात झालीय.
संपूर्ण महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) पाळला जातो.
जोपर्यंत रोजा संपत नाही तोपर्यंत काहीही खात नाहीत किंवा कोणतेही पेय घेत नाहीत.
आजारी व्यक्ती, लहान मुलं,गरोदर महिला, स्तनदा माता, मासिक पाळीच्या काळातून जाणाऱ्या महिला तसेच प्रवाशांना रोजातून सूट दिली जाते.
उपवासाच्या काळात शरीरात पाणी कमी प्रमाणात जातं. यासाठी पाणी लवकर पिणं आवश्यक . नाहीतर घामामुळे शरीरातलं पाणी निघून जातं त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी खालावते.
आपल्या आहारावर नियंत्रण येत असल्यानं उपवास करणं आरोग्यासाठी चांगलं असतं.
वजन कमी करण्यासाठी सतत उपवास करतच राहणं हे चांगलं नाही.
आठवड्यातूनकेवळ पाच दिवस अन्न घेणं आणि दोन दिवस उपवास करणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर.