Ruchika Jadhav
राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ या दरम्यान केली.
राजकोट किल्ला मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ भागात आहे.
राजकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. तर एकाच बाजूस जमिनीचा भाग आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाचे औचित्य साधून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला.
मुंबईहून या किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला आधी मालवणला यावे लागेल.
मालवणला आल्यावर एसटी बसमधून तुम्ही थेट राजकोट किल्ल्यावर पोहचू शकता.