ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राची मुंबई ही स्वप्नांचे शहर म्हणून ओळखली जाते.
मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यापासून बॅलिवूडपर्यंत, संग्रहालये, मंदिरे, आणि अनेक इतर गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया सर्वेात्तम पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियाला भेट दिल्यावर बोट राईड, फेरी राइड, किंवा खाजगी यॅाटचा आनंद घेता येईल.
मुंबई शहरातील समुद्रकिनारे पर्यटकांना फिरण्यासाठी फार उत्तम आहे. जुहू चौपाटीला पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते. त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गरम्य दृश्ये, शांत वातावरण अनुभवता येईल.
मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर एक प्रसिद्ध मंदिरांपैकी आहे. विनायक म्हणून ओळखले जाणारे गणेश मंदिर जगभरातील भक्तांना त्यांच्या इच्छेसाठी आकर्षित करत असते.
मुंबई शहरातील हाजी अली दर्गा खूप प्रसिद्ध आहे. हाजी अली दर्गा समुद्रकिनाऱ्यापासून ५०० मीटर अंतरावर आहे. पर्यटकांना हाजी अलीचे स्थापत्य सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व पाहायला मिळेल.
मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर धाकजी दादाजी यांनी १८३१ मध्ये बांधले होते. महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
मुंबईमधील मरीन ड्राइव्हला राणीचा हार म्हटले जाते. पर्यटकांना मरीन ड्राइव्हला भेट दिल्यावर नयनरम्य सूर्यास्त आणि सूर्योद्य अनुभवायला मिळेल.
NEXT: रिकाम्या पोटी दुधासोबत 'या' फळाचे सेवन करणे फायदेशीर