ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिकाम्या पोटी दुधासोबत केळी खाल्ल्याने रक्तदाबासह अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येते.
केळी खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा आणि पोषक तत्त्वे मिळतात.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते बीपी नियंत्रणात करत असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन सी देखील असते.
दुधामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम आणि झिंक सारखे गुणधर्म असतात. जाणून घेऊया केळीसोबत दुध खाण्याचे फायदे
उच्च रक्तदाबाचे रुग्ण सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात दूध आणि केळी खाऊ शकतात. यामुळे त्या रुग्णाचा बीपी कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होईल.
नाशत्यामध्ये दूध आणि केळीचा शेक पिल्याने वजन वाढण्यास मदत होत असते.
दूध आणि केळी खाल्याने शरीराला कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर जीवनसत्तवे मिळत असतात. त्याचबरोबर आपल्या हाडांचे आरोग्या देखील सुधारते.
केळी पोटासाठी गुणकारी असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दसऱ्याची योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया