Shreya Maskar
तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात वसलेला आहे. तोरणा किल्ला मुंबईपासून जवळ आहे. तुम्ही येथे वीकेंड ट्रिप प्लान करू शकता.
तोरणा किल्ला, ज्याला 'प्रचंडगड' असेही म्हणतात, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला होता.
तोरणा किल्ला सर्वात उंच गिरीदुर्ग (४,६०३ फूट) आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. या किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.
तोरणा किल्ला ट्रेकिंगसाठी खास आहे. येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येते. येथे तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यात जाऊ शकता.
तोरणा किल्ल्यावरून राजगड आणि सिंहगड या किल्ल्यांचे विहंगम दृश्य दिसते. सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.
तोरणा किल्ल्यावर झुंजार माची आहे. ती तिच्या अभेद्य तटबंदी आणि अवघड भौगोलिक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. या माचीवरून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विहंगम दृश्य दिसते.
तोरणा किल्ल्यावरील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे प्राचीन मेंगाई देवीचे मंदिर होय. येथे जाताच तुम्हाला शांती मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.