Shreya Maskar
ठाण्याला तलावांचे शहर म्हटले जाते. ठाणे स्टेशन बाहेर काही अंतरावर तलाव पाळी हे ठिकाण आहे. तलाव पाळीच्या आजूबाजूला खाण्यासाठी उत्तम स्ट्रीट फूड मिळते.
येऊर टेकड्यांनी उपवन तलाव वेढलेले आहे. येथे संध्याकाळचा फेरफटका मारायला स्थानिक लोक येतात. येथे पर्यटक बोटिंगचा आनंद घेतात. तसेच सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते.
ट्रेकिंग आणि हिरव्यागार टेकड्यांमध्ये फिरण्याचा आनंद घेण्यासाठी येऊर हिल्सला भेट द्या. येऊर हिल्स संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे.
गायमुख चौपाटी ही घोडबंदर रस्त्यावर आहे. येथे निसर्गरम्य बोटिंग करता येते. तसेच जवळून पक्षी निरीक्षणही होते. सूर्यास्ताचा येथे एक सुंदर नजारा पाहायला मिळतो.
ठाण्यापासून सुमारे ६० किमी अंतरावर तानसा तलाव- वन्यजीव अभयारण्य आहे. जेथे तुम्ही वन डे ट्रिप प्लान करू शकता. पक्षी निरीक्षण, निसर्ग ट्रेकिंगसाठी हे ओळखले जाते.
ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यान याला नक्की भेट द्या. ठाण्याजवळचे एक शांत निसर्गरम्य ठिकाण आहे. जिथे शेकडो फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात.
ठाण्याजवळ पारसिक हिल धबधबा आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता. तुम्हाला येथे उन्हाळ्यात थंड वातावरण अनुभवता येईल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.