Kalyan Tourism : कल्ला मस्ती ऑन द वे! वीकेंडला फिरा 'कल्याण'जवळील 'हे' पिकनिक स्पॉट्स, प्लान करा Summer ट्रिप

Shreya Maskar

कर्जत हिल स्टेशन

कर्जत हिल स्टेशन हे लोकप्रिय पर्यटन स्थळआहे . सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असून ट्रेकिंग, धबधबे आणि सुट्टी घालवण्यासाठी उत्तम आहे.

Karjat Hill Station | google

मलंगगड किल्ला

मलंगगड किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. जो ७०० वर्षांहून अधिक जुना आहे. ३ ऱ्या शतकात शिलाहार राजाने बांधलेला हा किल्ला नंतर मराठा आणि ब्रिटिशांच्या ताब्यात होता.

Malanggad Fort | google

माथेरान

कल्याणजवळ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे सनसेट पॉइंट्स, टॉय ट्रेन यांचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे थंड वातावरणात निवांत वीकेंड घालवू शकता. सुंदर फोटो क्लिक करू शकता.

Matheran | google

टिटवाळा गणेश मंदिर

कल्याणजवळ प्रसिद्ध टिटवाळा गणेश मंदिर (सिद्धिविनायक महागणपती मंदिर ) आहे. येथे तुम्हाला शांत आणि आध्यातमिक वातावरण अनुभ‌ता येते. येथे लांबून पर्यटक येतात.

Titwala Ganesh Temple | google

काळा तलाव

कल्याण मधील 'काळा तलाव' (शेनाळे तलाव) हे एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी बोटिंग, फिशिंग, लेझर शो, आणि तरंगता पूल यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

Kala Talao | google

येऊर हिल्स

तुम्हाला जंगल ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर येऊर हिल्सला नक्की भेट द्या. हे पक्षी निरीक्षणासाठी सुंदर ठिकाण आहे.

Yeoor Hills | google

माहुली किल्ला

माहुली हा डोंगरी किल्ला आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. ट्रेकर्समध्ये हे ठिकाण खूप लोकप्रिय आहे.

Mahuli Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Kalyan | google

NEXT : गोव्यातील 'हा' समुद्रकिनारा रात्री हिऱ्यासारखा चमकतो, पाहताच क्षणी सौंदर्यात हरवून जाल

Goa Tourism | saam tv
येथे क्लिक करा...