Shreya Maskar
नंदुरबार जिल्ह्यात एक थंड हवेचे ठिकाण लपलंय.
महाराष्ट्रातील या निसर्गरम्य ठिकाणाचे नाव तोरणमाळ आहे.
सातपुडा पर्वतरांगेत तोरणमाळ हे हिल स्टेशन आहे.
तोरणमाळ हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.
येथील यशवंत तलाव आणि कमळ तलावाचे सौंदर्य पाहताच मन मोहून जाते.
तुम्ही येथील सीताखाई ट्रेलला जाण्यासाठी ट्रेकिंगही करू शकता.
तोरणमाळ या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची गुहा देखील आहे.
महाशिवरात्री दरम्यान गोरक्षनाथांची यात्रा तोरणमाळ येथे भरते.