Dhanshri Shintre
भारतीय बाजारात ४ मीटरपेक्षा लहान कॉम्पॅक्ट एसयूव्ही लोकप्रिय आहेत, कारण त्या किफायतशीर आणि वापरास सोयीस्कर असतात.
काही एसयूव्हींची विक्री वाढली आहे, तर काही मॉडेल्सच्या विक्रीत महत्त्वाची घटही दिसून येत आहे.
जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करू इच्छित असाल, तर गेल्या महिन्यातील टॉप 6 कॉम्पॅक्ट एसयूव्ही विक्री आकडे पाहा.
जून 2025 मध्ये 14,507 युनिट्स विकून मागील वर्षीच्या तुलनेत मारुती सुझुकी ब्रेझा 10% विक्री वाढ नोंदवली, किंमत 8.69 लाखांपासून.
टाटा नेक्सनने दुसऱ्या स्थानावर ठसे उमटवले, परंतु जून 2025 मध्ये विक्रीत ४% घट नोंदली गेली आहे.
जून 2025 मध्ये टाटा पंचची विक्री 10,446 युनिट्सवर आली, मागील वर्षीच्या तुलनेत ४३% मोठी घट झाली आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने जून 2025 मध्ये 9,815 युनिट्स विकून आपले स्थान मजबूत करत १% वाढ नोंदवली आहे.
जून 2025 मध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओची विक्री ७०८९ युनिट्सवर आली, १७% घट असून, नवीन फीचर्ससह उपलब्ध आहे.
जून 2025 मध्ये ह्युंदाई व्हेन्यूची विक्री 6,858 युनिट्सवर आली, मागील वर्षीच्या तुलनेत 31% घट नोंदवली गेली.