Dhanshri Shintre
७२.२० लाखांपासून सुरू होणाऱ्या मर्सिडीज-बेंझ EQB मध्ये ७०.५ kWh बॅटरी असून ती २८८ bhp व ५२० Nm टॉर्क निर्माण करते.
६७.२० लाख रुपये किंमतीपासून सुरू होणाऱ्या मर्सिडीज-बेंझ EQA मध्ये ७०.५ kWh बॅटरी असून ती १८७.४० bhp व ३८५ Nm टॉर्क देते.
मर्सिडीज-बेंझ EQA ही कार या यादीत सर्वाधिक म्हणजेच ५६० किमी पर्यंतची ड्रायविंग रेंज देणारी इलेक्ट्रिक SUV ठरते.
५९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या व्होल्वो C40 रिचार्जमध्ये ७८ kWh बॅटरी असून ती ४०२.४१ bhp व ६६० Nm टॉर्क निर्माण करते.
४९ लाख रुपये किंमतीपासून सुरू होणाऱ्या व्होल्वो XC40 रिचार्जमध्ये ६९ kWh बॅटरी असून ती २३८ bhp व ४२० Nm टॉर्क निर्माण करते.
व्होल्वो XC40 रिचार्ज ४७५ किमीची रेंज देते, तर BMW iX1 LWB ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४९ लाख रुपये आहे.
बीएमडब्ल्यू iX1 LWB मध्ये ६६.४ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असून तो २०४ bhp पॉवर आणि २५० Nm टॉर्क निर्माण करतो.
BMW iX1 LWB ही इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर तब्बल ५३१ किमी पर्यंतची ड्रायविंग रेंज प्रदान करते.