Dhanshri Shintre
आपोआप चालणाऱ्या म्हणजेच स्वयंचलित कार्सची मागणी सध्या झपाट्याने वाढत असून त्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
विशेषतः अशा शहरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी नेहमीची आहे, तिथे स्वयंचलित कार्स अधिक सोयीच्या ठरतात.
मॅन्युअलच्या तुलनेत ऑटोमॅटिक गाड्या चालवणं अधिक सोपं आणि आरामदायक मानलं जातं, विशेषतः शहरांमध्ये.
ऑटोमॅटिक गाडीत डावा हात व पाय वापरण्याची गरज नसते, त्यामुळे वाहन चालवणं अधिक सोपं वाटतं.
ऑटोमॅटिक कारमध्ये गीअर आपोआप बदलले जातात, त्यामुळे चालकाला सतत गीअर बदलण्याची गरज भासत नाही.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाड्या मॅन्युअलच्या तुलनेत अधिक इंधन बचत करणाऱ्या आणि कार्यक्षम मानल्या जातात.
ऑटोमॅटिक कारमध्ये क्लच नसल्यामुळे त्याची देखभाल कमी खर्चिक व सुलभ होते, त्यामुळे खर्च वाचतो.
ऑटोमॅटिक कार्स आधुनिक आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सज्ज असतात, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होतो.