Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात सह्याद्री पर्वत जणू हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसतो.
तुम्ही सह्याद्रीमध्ये फक्त गडकिल्लेच नाही तर लेणी, मंदिरे असे नानाप्रकारचे दृश्य पाहू शकता.
पुढे पावसाळ्यात ट्रकिंगसाठी ऑफबीट आणि गुप्त ठिकाणांची थोडक्यात माहिती दिली आहे.
तुम्हाला धार्मिक आणि मजेदार ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर १० किलोमीटर अंतर असणारा जंगल ट्रेक पार करा.
ताम्हिणी घाटातून पिंपरी गावातून ट्रेकिंगला सुरुवात करा याचा शेवट चमत्कारी घनदाट जंगलात होईल.
भंडारदऱ्यातील घाटघर गावातून ट्रेकला सुरुवात करून अभुतपुर्व नजाराणा तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडेल.
पावसाळ्यात तुम्हाला ट्रेकींग करताना लक्ष्मी धबधब्याच्या शेजारील सुंदर दृश्य पाहुन उपांडे घाट पाहता येईल.
ताम्हिणी घाटातील आदरवाडीतून हा ट्रेक सुरु होतो. जो कोकणात उतरतो. तिथे तुम्ही कमी गर्दीत फॅमिलीसोबत मजा करू शकता.