Manasvi Choudhary
ठाण्यात पर्यटकासाठी भेट देण्यासाठी कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत हे जाणून घेऊया.
ठाणे शहर हे पर्यटनासांठी आकर्षणाचे केंद्र आहे.
ठाणे शहरात गर्दीपासून लांब आणि शांत ठिकाण म्हणजे उपवन तलाव आहे.
निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आनंद घ्या.
ठाणे शहरात डोंगराळ भागात येऊर हिल्स आहे. खास पावसाळी पिकनिक प्लान तुम्ही या ठिकाणी करू शकता.
ठाण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर अक्सा बीच आहे. समुद्रकिनाऱ्यावर भेट देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
हजारो झाडे आणि रंगीबेरंगी फुलपाखरे पाहण्यासाठी तुम्ही ओवळेकर वाडी फुलपाखरू बाग या ठिकाणी भेट द्या.