ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईला भारताची मायनगरी म्हणून ओळखले जाते. येथे विविध ठिकाणाहून नागरिक येत असतात. मुंबई ही विविध सांस्कृतिक स्थळांसाठी प्रसिध्द आहे.
मरिन ड्राइव्ह हे मुंबईतील अत्यंत सुप्रसिध्द असे ठिकाण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे ठिकाण हवे हवेसे वाटणारे आहे. मरिन ड्राइव्हवरील संध्याकाळचा नजारा बघण्यासारखा असतो.
हा मुंबईतील प्रसिध्द बीच आहे. येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. तसेच येथे चाट स्नॅक्सचा आनंद घेत संध्याकाळच्या वेळेला छान सूर्यास्त पाहायला मिळतो.
एलिफंटा गुफा लेणी मुंबईपासून १० किमी अंतरावर असलेल्या एलिफंटा बेटावर स्थित आहे. येथे जाण्यास फेरी बोटिचा वापर करावा लागतो.
गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील ऐतिहासिक स्मारक आहे. येथे रोज हजारो लोक येत असतात. या स्मारक समोरच मुंबईतील फाइव्ह स्टार ताज हॉटेल स्थित आहे.
हे मुंबईतील लाखो लोकांचे श्रध्दास्थान आहे. लाखो भक्त येथे दर्शनास रोज येतात. येथील वातावरण भक्तीभावाने भरलेले असते.
मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. मुंबईच्या लोकल मधून प्रवास करण्यात एक वेगळीच मज्जा आहे. मुंबईत आल्यावर एकदा तरी लोकलने प्रवास करुन बघा.