ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोव्याला फिरायला जाण्याचे लोकांचे स्वप्न असते. गोवा हि जागा अत्यंत सुंदर असल्यामुळे येथे कोणालाही जाण्यास प्रचंड आवडते.
गोव्यात फिरण्यासाठी खुप ठिकाणे आणि बीचेस असून हिडेन प्लेसेस सुध्दा आहेत .जर तुम्ही गोवा जायचा प्लॅन करित असाल तर, हिडेन प्लेसेसवर नक्की जा.
गोव्यातील इतर समुद्रांपैंकी या समुद्रावर खूप शांतता असते. हा बीच निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध मानला जातो. गलगीबागा बीच कोणाला फारसा माहिती नसल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी कमी असते.
साउथ गोव्यात चांदोर नावाचे एक सुंदर गाव स्थित आहे.हे गाव नदीच्या काठावर आहे. येथे जुन्या काळातील घरे आणि वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील.
गोव्यात पाहण्यासारखे आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे काबो दे रामा किल्ला.भगवान राम येथे राहिले होते असे म्हटले जाते. या फोर्ट जवळ नैसर्गिक सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा आहे.
हा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असा आहे. या ठिकाणी ट्रेकने किंवा फेरीनेच पोहचता येते. तसेच पाण्यात दिसणारे डॉल्फिन्स हि या बटरफ्लाय बीचची खासियत आहे.
हे एक बेट आहे जे गोव्याच्या किनाऱ्यापासून दूर असून तेथे जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. या आयलंडवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो. जसे की, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जेट स्की आणि पॅरोसेलिंग हे सगळे करता येते.
हा गोव्यातील एक शांत आणि कमी गर्दीचा सुंदर समुद्रकिनारा आहे. नारळाची झाडे, सोनेरी वाळू आणि पारंपारिक गोवन खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो.
सप्टेंबर ते फेब्रुवरी या काळात गोव्याला तुम्ही भेट देऊ शकता. या काळात गोवा पर्यटकांनी भरलेला असतो.