ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर शरीरातील मुख्य कार्य आणि प्रथिने वाढविण्याचं काम करतं.
सध्या आपण बदलत्या जीवनशैलीमुळे नकळत फास्टफूडच्या आहारी गेलो आहे.
फास्टफूडमूळे लिव्हरमध्ये विष आणि टाकाऊ पदार्थ जमा होण्याची शक्यता आहे.
लिव्हरशी संबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही ज्यूस तुमच्या आरोग्याला लाभदायी ठरतील. तुमच्या लिव्हरला सूज येत असेल. तर कोरफडीचा ज्यूस खूप फायदेशीर ठरू शकतो.
आवळ्याचा ज्यूस घेतल्याने शरीरातले रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
लिव्हरचे नूकसान भरून काढण्यासाठी मेथीच्या दाण्यांचे पाणी घेऊ शकता. मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
लिंबाचा चहा घेतल्याने लिव्हरची कार्य सुधारतं. तसेच मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
अॅप्पल सायडर व्हिनेगरमुळे लिव्हरमधील तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर काढते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रक्षाबंधनाला लाडका भाऊ घरी येणार, त्याच्यासाठी अशी खास बेसनाची गोड बर्फी करा!