Priya More
२०२३ हे वर्ष बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी खास ठरले. काही चित्रपट इतके सुपरहिट ठरले की त्यांनी बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये जबरदस्त कमाई केली.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेले काही चित्रपट असेही आहेत की त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या चित्रपटांतील काही सिन्स, कपड्यांवर आक्षेप घेत आंदोलनं करण्यात आली
शाहरुख खानच्या पठान चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद निर्माण झाला होता.
दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीमुळे चित्रपटाल विरोध करण्यात आला. आंदोलनं करत पोस्टर्स जाळण्यात आले होते.
प्रभासचा 'आदिपुरुष' चित्रपटाने ६०० कोटींची कमाई केली असली तरी देखील त्याने प्रेक्षकांची निराशा केली.
आदिपुरुषमधील संवादांपासून काही वादग्रस्त सिन्सवर आक्षेप घेण्यात आला. या चित्रपटाच्या लेखकाने माफी देखील मागितली होती.
अक्षय कुमारच्या 'ओएमजी २' या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवरून बराच वाद झाला होता.
पुजाऱ्यांनी 'ओएमजी २' चित्रपटाच्या निर्मात्यांना लीगल नोटीस देखील पाठवली होती. या चित्रपटातील काही सिन्स काढून टाकण्यात आले होते.
'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या टीझर, पोस्ट आणि ट्रेलरवरून सुरू झालेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत कायम होता.
अनेकांनी हा केवळ एका विशिष्ट समुदायाचा प्रचार असल्याचे म्हटले होते. या चित्रपटाला राजकीय पक्षांपासून ते मुस्लीम संघटनांपर्यंत अनेकांनी विरोध केला.
रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटावरून देखील वाद निर्माण झाला आहे. काहींना या चित्रपटाची कथा आवडली तर काहींना नाही.
'अॅनिमल'मध्ये मेरिटल रेप, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि बोल्ड सीन्स यासारख्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दाखवल्या गेल्या आहेत. याला विरोध करण्यात आला.