Parenting Tips : मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याचे 8 रामबाण उपाय, 'मोबाईल'पासूनही राहतील दूर

Shreya Maskar

पालकत्वाच्या टिप्स

आजकाल मुलांचे अभ्यासापेक्षा मोबाईलमध्ये जास्त लक्ष असते. ज्यामुळे त्यांची अभ्यास करायची इच्छा होत नाही. यावर रामबाण उपाय जाणून घेऊयात.

Parenting Tips | yandex

मनोरंजन

लहान मुलांना मनोरंजनातून, खेळातून अभ्यासाची गोडी लावा. यामुळे त्यांचा अभ्यासात रस वाढेल आणि स्वतःहून मोबाईल ठेवून पुस्तक हातात घेतील.

Parenting Tips | yandex

डिजिटल युग

सर्वात महत्त्वाचे मुलांना लहान वयात मोबाईल देऊ नका. यामुळे ते लवकरच डिजिटल युगात पाऊल ठेवतात. तसेच मोबाईल वापरताना त्यांच्या बाजूला बसा.

Parenting Tips | yandex

छंद

मुलांना पाटी, वहीवर चित्र काढायला लावा ज्यामुळे मुलांना लिहिण्याची, ऐकण्याची, एका जागी बसण्याची सवय लागेल. तसेच त्यांचा छंद देखील जोपासला जाईल.

Parenting Tips | yandex

क्लास टाळा

पालकांनो मुलांना क्लासला टाकण्यापेक्षा तुम्ही स्वतः मुलांचा अभ्यास घ्या. मुलांसोबत वेळ घालवा. जेणेकरून त्यांना मोबाईलचे आकर्षण राहणार नाही.

Parenting Tips | yandex

शिकवण्याची पद्धत

मुलांना चित्रातून, कवितून, खेळातून, प्रश्नमंजुषेतून एखादा ‌विषय समजवा. जेणेकरून ते कायम त्यांच्या लक्षात राहील.

Parenting Tips | yandex

पोषक आहार

मुलांच्या चांगल्या अभ्यासासाठी त्यांना पोषक आहार द्या. व्यायामाची सवय लावा. मुलांना मोबाईलचा वापर फक्त अभ्यासासाठी करू द्या.

Parenting Tips | yandex

वेळापत्रक

मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. जेणेकरून त्यांना एक शिस्त लागले. तसेच अभ्यास करावासा वाटेल.

Parenting Tips | yandex

NEXT : पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही, घरीच करा स्वस्तात मस्त नेल आर्ट

Nail Art Tips | yandex
येथे क्लिक करा...