Shreya Maskar
नेल आर्ट करण्यासाठी नखांना वेगवेगळ्या रंगाचे नेलपॉलिश लावा. पाच बोटांना वेगवेगळे नेलपॉलिश लावल्याने हात आणखी छान दिसतो.
नेल आर्टमध्ये फ्लोअर प्रिंट ही ट्रेडिंग स्टाइल आहे. तसेच यात तुम्ही वेगवेगळ्या छोट्या डिझाइन देखील काढू शकता.
नेलपॉलिश लावण्याआधी बेस कोटचा वापर करा. यामुळे नखांचे संरक्षण होते. तसेच नेल आर्ट देखील चांगले होते.
फुलांचे नक्षीकाम करण्यासाठी टूथपिकचा वापर करा. छोटी छोटी फुलांची नक्षी काढा.
पेस्टल रंग नेल आर्टसाठी सुंदर आहेत. तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिशचा रंग निवडा.
प्रत्येक नखांना वेगवेगळ्या रंगाचे नेलपॉलिश लावा. जेणेकरून नखं कलरफुल दिसतील.
नखांना चमक येण्यासाठी त्यावर कोटिंग करा. तुम्ही चमकीची नेलपॉलिश देखील वापरू शकता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नेल आर्टच्या मस्त डिझाइन शिका आणि घरीच सिंपल पद्धतीने सुंदर नेल आर्ट बनवा.